पुणे : राज्यात शिक्षक भरती टांगणीलाच आहे. अशाच राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिक्षण घेऊनही नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या पदरी निराशाच आली आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेस न्यायालयीन प्रकरणामुळे विलंब होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यात जिल्हा परिषदेत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता रिक्त शिक्षकांच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना यापूर्वीच शालेय शिक्षण विभागाने दिली होती. त्या निर्णयावर आज राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले.
पदे भरताना ‘हे’ नियम असतील
- नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असेल.
- जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी हे संबधित शिक्षकांशी करार करतील.
- या शिक्षकांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. या हमीपत्रात त्यांच्याकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही.
- सदर नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या
ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात
टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी
धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे