Sunday, December 8, 2024
Homeराजकारणमहादेव जानकरांचा भाजपाला इशारा, 'या' 5 ठिकाणच्या जागा लोकसभेसाठी दिल्या तरच…

महादेव जानकरांचा भाजपाला इशारा, ‘या’ 5 ठिकाणच्या जागा लोकसभेसाठी दिल्या तरच…

मुंबई : आगामी लोकसभेचे वारे आताच वाहू लागले आहे. देशात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर भाजपाचे ‘मिशन 2024’ यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधत असताना एनडीएमधील (NDA) मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत एनडीएमध्ये राहू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असा इशारा जानकर यांनी दिला आहे.

महादेव जानकर यांनी आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केला. यावेळी सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून जनता शहाणी असते, असा टोला महादेव जानकर यांनी भाजपला लगावला आहे. यावरून राज्यात भाजप आणि शिंदे गटात अजित पवार यांचा गट सामील झाल्याने एकप्रकारची नाराजी महादेव जानकर यांनी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात आजपासून महादेव जानकर हे आपल्या पक्षाची यात्रा घेऊन निघालेले आहेत. भाजपने जर आमचा विचार केला नाही तर लोकसभेच्या देशात 453 जागा लढवणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एक दिवस मी देशाचा पंतप्रधान बनणार आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येणार असा दावाही महादेव जानकर यांनी केला.

महादेव जानकरांचा इशारा भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण, बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या महादेव जानकर यांनी मागितलेल्या सर्व पाचही जागांवर आतापर्यंत भाजप निवडणूक लढवत आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

संबंधित लेख

लोकप्रिय