Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर व चपलांचे वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर व चपलांचे वाटप

मावळ / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली, जाधववाडी येथील संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सीता ताई केंद्रे यांनी मावळ येथील सावळे येथील मेटलवाडी व खांडी  येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळातील ३२ मुलामुलींना दप्तर व चपलांचे वाटप केले. (Distribution of notebooks to tribal students)

सावळे, खांडी या अतिशय दुर्गम गावात १९६३ पासून जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. अलीकडच्या काही वर्षात येथील पटसंख्या कमी होत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी मुलांमध्ये सुनील धोबे, जलील शेख, तेजुसिंग राठोड हे शिक्षक विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत.

‘वुई टूगेदर फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेचे मावळ येथील कार्यकर्ते चंद्रकांत खांडभोर, योगेश गोंठे, अंजना खंडागळे यांनी पिंपरी चिंचवडच्या दानशूर सामाजिक कार्यकर्त्या सीताताई केंद्रे यांना येथील विद्यार्थ्यांची परिस्थिती सांगितली. दप्तर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Distribution of notebooks to tribal students

त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक नीरज भटनागर, उद्योजक बाबूलाल चौधरी तसेच संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टच्या माया सांगवे, बालाजी कांबळे, दत्ता सांगवे, जयराम हंगे, हिरकांत भोंग यांनी उत्कृष्ट दर्जाची दप्तर्स व चपलाचे वाटप केले. वुई टूगेदर फाउंडेशनचे शैलजा कडुलकर, रुकसाना काझी, श्याम वानखेडे यावेळी उपस्थित होते.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती  

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी 

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज   

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती  

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज ! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती

 Distribution of notebooks to tribal students
 Distribution of notebooks to tribal students
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय