Sunday, April 28, 2024
Homeग्रामीणआंबे पिंपरवाडी अंतर्गत येणाऱ्या 5 वाड्या वस्त्यांना जिम साहित्याचं वाटप

आंबे पिंपरवाडी अंतर्गत येणाऱ्या 5 वाड्या वस्त्यांना जिम साहित्याचं वाटप

जिम साहित्य वाटपामुळे गावातील तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण

जुन्नर : आंबे पिंपरवाडी ग्रुप ग्रामपंचायत येथे जिम साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या  माळवाडी, काठेवाडी, नामदेववाडी, आंबे गावठाण व पिंपरवाडी या वाड्या वस्त्यांना स्वतंत्रपणे जिम साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अप्पर बॉडी चे प्रत्येक वाडी वस्तीमध्ये 200 केजी साहित्य वाटप करण्यात आले असून त्यामध्ये  बॅक, बायसेप, ट्रायसेप, शोल्डर, स्किपिंग रोप व गोळा इत्यादी प्रकारच्या व्यायामाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे.

या साहित्य वाटपामुळे गावामध्ये कुस्ती, पोलीस भरती, आर्मी भरती, वन विभागाची भरती, पीएसआय भरती इत्यादी प्रकारच्या नोकर भरतीची तयारी करणार्‍या मुलांमध्ये समाधानाच व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मुकुंद घोडे, ग्रामसेवक लहू भालिंगे, उपसरपंच अलका काटे, राघोजी युवा प्रतिष्ठान जुन्नरचे प्रमुख गणपत घोडे, पोलीस पाटील विष्णू घोडे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद रेंगडे, लता किरवे, ग्राम रोजगार सेवक संदीप शेळकंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसेवक लहू भालिंगे यांनी ग्रामपंचायतीला नवनवीन संकल्पनाच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका मांडली. राघोजी युवा प्रतिष्ठानचे प्रमुख गणपत घोडे म्हणाले, जिम साहित्य नोकर भरतीसाठी उपयुक्त ठरेल. तसेच गावातील तरुणांनी विविध प्रकारच्या नोकर भरतीची तयारी करावी. तसेच गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा.  त्यामुळे गावातील लोकांना रोजगारासाठीचे स्थलांतर थांबून त्यांना गावातच रोजगार उपलब्ध होईल. तसेच गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.  एसईझेडमुळे आपल्या गावावरती नकारात्मक परिणाम होणार आहे.

अध्यक्षीय भाषणात सरपंच मुकुंद गोडे म्हणाले, पुढील दोन वर्षात गावात विविध प्रकारचे विकास कामे राबवून गावाचा कायापालट करण्याचा निर्धार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रेंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शैलेश डगळे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय