Sunday, May 12, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांविरोधात 'भारत बंद'ला पाठिंबा देत 'आप'ची निदर्शने

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायद्यांविरोधात ‘भारत बंद’ला पाठिंबा देत ‘आप’ची निदर्शने

सीताबर्डीमध्ये ‘भारत बंद’ ला सकारात्मक प्रतिसाद

नागपूर (अमित हटवार) : आम आदमी पक्षातर्फे सकाळी ११ वाजता सीताबर्डी येथे केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील ३५ शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंद ला पाठींबा देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभाग घेत निदर्शने केली.

तसेच सीताबर्डी येथील व्यावसायिकांना, व्यापारी संघटनांना नम्रपणे निवेदन करून, त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आवाहन करण्यात आले. तसेच आपली प्रतिष्ठाने, दुकान बंद ठेवून शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला समर्थन करण्याविषयी सांगण्यात आले.  

व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपली दुकाने बंद करून भारत बंदमध्ये सहभागी झाले सीताबर्डी येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आणि सहभागी होऊन समर्थन केले. 

भारत बंद च्या आंदोलनात विदर्भ संयोजक व राज्य समिती सदस्य देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाद्यक्ष जगजीत सिंघ, नागपुर संयोजक कविता सिंघल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्य सहसचिव अशोक मिश्रा, अमरीश सावरकर, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, प्रशांत निलाटकर, अजय धर्मे, हरीश गुरबानी, रोशन डोंगरे, दिलीप बिडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय