पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पर्यावरण दिनानिमित्त (World environment day) देहुरोड येथील स्मशानभूमीच्या परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. Dehu
देहुरोड कँन्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष ऍड. कैलास पानसरे व डॉ. रमेश बन्सल यांच्या प्रयत्नातून स्थानिक प्रजातींची झाडे यावेळी लावण्यात आली. याप्रसंगी भास्कर रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन वृक्षारोपणाचे महत्व सांगितले. Dehu Road
देहुरोड कँन्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष, अधिकारी व सर्व कर्मचारी या सर्वांचे गेली तिन वर्ष सलग नियमितपणे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व संवर्धनासाठी सहकार्य व योगदान मिळते त्याबद्दल सर्वांच्या वतीने धन्यवाद मानले. तसेच स्मशानभूमी परिसरात तन मन व धनाने नंदनवन फुलवणारे प्रा. कैलाशचंद गोयल यांचा कैलास पानसरे व डॉ. रमेश बन्सल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Dehu Road news
झाडांच्या सुरक्षिततेसाठी सिटी वन ग्रुपने लोखंडी पिंजरे उपलब्ध करुन दिले, त्याबद्दल संचालक सुमित आगरवाल यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात येऊन त्यांच्या हस्ते वृक्षपूजा करण्यात आली.
याप्रसंगी जयंत जाधव, सुनील आगरवाल, अशोक थोरात, रेक्स योहान, धनंजय राऊत, मनेश म्हस्के, विजय सातपुते, अर्चना राऊत, आदि निसर्ग मित्र उपस्थित होते. सदर वृक्षारोपण व संवर्धनासाठी देहुरोड कँन्टोन्मेट बोर्ड, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्ग मित्र विभाग, वृक्षदायी संस्था देहुगाव संस्थांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा :
चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
पावसाळ्यात फिरायला कुठे जायचं? माळशेज घाटला भेट द्या!
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?
मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार
Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा