Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

Naresh Mhaske : देशभरात नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत महाविकास आघाडीने आपला करिष्मा दाखवत ३० खासदार निवडून आणले. त्यामध्ये काँग्रेसचे १३ खासदार, शिवसेना (ठाकरे गट) ९ तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) ८ खासदार निवडून आले आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. अशात शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाचे दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. असे म्हणत या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितल्याचा दावा केला आहे.

दोन खासदारांनी पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.

तसेच, उद्धव ठाकरेंनी मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे.

Naresh Mhaske यांचा दावा फेटाळला

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी असला थिल्लरपणा करु नये, अशी टीका करत शिंदे गटाचा दावा फेटाळला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय