Wednesday, January 22, 2025

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

Rahul Zaware : अहमदनगर लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पारनेर येथे निलेश लंके (Nilesh Lanke) आणि सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला त्यावेळीच झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला.

निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) राहुल झावरे (Rahul Zaware) यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या समर्थकांकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. राहुल झावरे यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली.

दरम्यान, मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांचा विजय झाला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके यांचे समर्थक आमने-सामने भिडले. या हल्ल्यामुळे अहमदनगरमधील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Rahul Zaware

आता पर्यंत पोलिसांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेनंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तसेच, या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण ही पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित

एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…

फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती

बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

Related Articles

- Advertisement -

Latest Articles