Wednesday, September 18, 2024
Homeताज्या बातम्याShinde Shivsena : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या...

Shinde Shivsena : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

Shinde Shivsena : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडला आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवारांचा दारूण पराभव केला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या निकालानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

लोकसभेतील महायुतीच्या पराभवानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काय होईल याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. अशात शिंदे गटातील आमदार पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटातील ६ आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत पक्षप्रवेश करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ६ आमदार नेमके कोण आहेत ते मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दावा केला आहे की, अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत. परंतु त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा? नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.

Shinde Shivsena

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी लोकसभेला ठाकरे गटाला मदत केल्याचे बोलले जात आहे. तसेच, विधानसभेला आमचा विचार करावा, अशी साद आता शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना घातली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित

एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…

फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती

बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

संबंधित लेख

लोकप्रिय