Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयManipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

कुकी आणि मैतेई समाजाच्या संघर्षात मणिपूर गेल्या जवळपास वर्षभर वांशिक हिंसाचारात जळत आहे. इथल्या बिगर आदिवासी म्हणजे मैतेई आणि आदिवासी कुकी आणि नागा या समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे.

२०२३ च्या सरकारी आकडेवारीनुसार, हिंसाचार सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास १५० लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतरच्या काळात आणखी ७१ जणांचा वांशिक हिंसेने बळी घेतला. सध्या एकूण मृतांची संख्या २२१ असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशातील विरोधी पक्षांनी अस्वस्थ मणिपूर कडे मोदी सरकारने लक्ष देऊन तेथील हिंसाचार थांबवा अशी मागणी वारंवार केली होती. Manipur

सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ आणि भारत सरकारने एकत्रितपणे मणिपूर मधील दोन्ही समुदायातील हिंसाचार रोखावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी जुन २०२३ मध्ये केली होती.
मात्र, केंद्र सरकारने मणिपूर कडे दुर्लक्ष केले.

मणिपूरमधील चुरचंदपूर जिल्ह्यामध्ये खरी वादाला सुरूवात झाली. या भागात कुकी आणि नागा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. सरकारी जमीन सर्वेक्षणाच्या निषेधनार्थ २८ एप्रिल २०२३ ला द इंडिजेनस ट्राइबल लीडर्स फोरमने आठ तासांच्या बंदची घोषण केली. या बंदने हिंसक रूप धारण केलं.

मणिपूरची लोकसंख्या ही २७ लाख इतकी आहे. त्यामध्ये ६० टक्के लोकसंख्या ही मैतेई समाजाची आहे, राजधानी इंफाळच्या खोऱ्यात मैतेई राहतात, त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. मात्र डोंगराळ रहात असलेल्या कुकी, नागा समाजाला तिथे अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे, आणि मैतेई मैतेई समुदायाची आरक्षणाची जुनी मागणी आहे की त्यांनाही जमातीचा दर्जा द्यावा. समाजाने यासाठी मणिपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मणिपूर हायकोर्टाने राज्यातील मैतेई समाजाला ‘अनुसूचित जाती’चा (एसटी) दर्जा देण्याची शिफारस सरकारला एका आदेशान्वये केल्यानंतर २७ मार्च २०२३ रोजी हायकोर्टाच्या निकालानंतर राज्यात वांशिक हिंसाचार उसळला होता. त्यानंतर मणिपूर हायकोर्टाने स्वतःचाच निर्णय रद्द केला परंतु मागील दीड वर्षे मणिपूर अशांत व हिंसाचारग्रस्त आहे. सुमारे १७५ हून जास्त नागरिक मृत झाले आहेत, ४७८६ घरेदारे हिंसाचारात नष्ट करण्यात आली आहेत. Manipur

मणिपूरसारख्या राज्यात असलेल्या समस्या फार संवेदनशीलतेने हाताळाव्या लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या राज्याची एक सीमा मान्यमारला भिडते. भारताचे शत्रू मणिपूरमधील भारतविरोधी शक्तींना सर्व प्रकारची मदत करत असतात. त्यामुळे कुकी आणि मैतेई मधील हा संघर्ष थांबवावा, त्यावर तोडगा काढावा अशी मागणी सातत्याने होत आहे.

आपल्या देशातील एक महत्वाचे राज्य हिंसाचाराने ग्रस्त आहे, याची दखल केंद्र सरकारने वेळीच घेतली असती तर दोन्ही जमाती मधील वैर संपुष्टात आले असते.

मैतेई आणि कुकी व अन्य यांच्यातील वांशिक संघर्षाने आतापर्यंत दोन्ही समुदायातील शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. एका वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात दोन्ही समुदायातील ७९ हजाराहून अधिक लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत. दंगलीत हजारो घरे, सरकारी आणि निमसरकारी मालमत्ता उद्ध्वस्त किंवा नुकसान झाले आहेत.

ऑगस्ट २०२३ मध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मणिपूर हिंसाचार व तेथील घडणाऱ्या घटनेबद्दल सरकारवर कठोर टीका केली होती. मात्र त्यावेळी लोकसभेत गदारोळ जास्त झाला आणि मणिपूरच्या प्रश्नांवर सरकारने व सर्व संसद सदस्यांनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करून मणिपूर वर विशेष लक्ष दिले नाही. (Our prime minister did not go to the state because for him, Manipur is not a part of India. Rahul Gandhi August 2023)


मणिपूर कडे लक्ष देणे गरजेचे आहे

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला. मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी एका पोलीस चौकीला आग लावण्यात आली. अनेक घरेही पेटवून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच १० जून २०२४ रोजी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी जिरीबामच्या दौऱ्यावर जाणार होते. सुरक्षा कर्मचारी पाहणीसाठी तिथे गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. सुरक्षा ताफ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेची दखल देशातील सर्व माध्यमांनी प्रथमच घेऊन मणिपूर मधील स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Manipur CM’s advance security convoy ambushed by suspected militants in Kangpokpi district)

युक्रेन युद्ध, इजरायल गाझा आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रश्नात लक्ष घालणाऱ्या तथाकथित बातम्या पेक्षा मणिपूर कडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे.

संघाने (RSS) केंद्र सरकारचे कान टोचले

नागपूरच्या रयेथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आरएसएसच्या ‘कार्यकर्ता चिंतन, प्रबोधन’ कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी बोलताना भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी मणिपूर (Manipur) राज्यात सध्या सुरू असलेल्या समस्या आणि हिंसाचाराकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे. मागील वर्षभरापासून हे राज्य शांततेची वाट पाहात असल्याचेही ते म्हणाले. आतातरी सरकार या गंभीर समस्येकडे लक्ष देईल, असा गर्भित इशारा सर संघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे दिला आहे. (RSS chief said, “It’s been a year since Manipur has been waiting for peace. It is important to resolve the conflict on priority.)

राष्ट्रीय एकत्मता आणि संविधनिक दृष्टिकोनातून पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन मणिपूर शांत केले पाहिजे, तेथील कुकी, मैतेई समुदायाच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आले आहे. देशातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे, कारण आता केंद्रात आघाडी सरकार आहे, विरोधी पक्षाची ताकद वाढली आहे.
सरकारची निमलष्करी दले, पोलीस यांच्या कडे कायदा सुव्यवस्था असली तरी तेथील मणिपूर सरकार अद्यापही हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय