Tuesday, January 21, 2025

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

Denmark : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर एका व्यक्तीने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान मध्य कोपनहेगन येथे एका कार्यक्रमात असताना अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डेन्मार्कच्या (Denmark) पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्लेखोराने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी घडली. हा हल्ला युरोपियन युनियन (EU) निवडणुकीपूर्वी झाला आहे. EUच्या निवडणुका 9 जून रोजी होणार आहेत. डॅनिश पंतप्रधान फ्रेडरिकसन सोशल डेमोक्रॅट्सच्या EU आघाडीच्या उमेदवार क्रिस्टेल शाल्डेमॉस यांच्यासोबत प्रचार करत आहेत. घटनेच्या वेळी त्या प्रचार आटोपून परतत होत्या. त्यावेळी हा हल्ला झाला. कोपनहेगन पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. सुदैवाने या हल्ल्यात मेटे यांना दुखापत झाली नाही.

Denmark

पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, त्यांनी पीएम मेटे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे आणि या घटनेचा तपास केला जात आहे.

दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच्यावर अनेक वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यालाही आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

Related Articles

- Advertisement -

Latest Articles