नाना काटे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रहाटणी – पिंपळे सौदागर येथे महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे सुमारे ४ एकर ऐवढ्या क्षेत्रात, आत्याधुनिक सर्व सोयीसुविधायुक्त योगा पार्क बांधण्यात आले आहे, महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत आतापर्यंत ३२४ कोटींची विविध विकास कामे करण्यात आली आहेत. pcmc
यापैकी स्मार्ट सिटी अंतर्गत योगा पार्क विकसित करण्यात आले आहे. हे योगा पार्क याच जुन महिन्याच्या अखेरीस नागरिकासाठी खुले करण्यात येणार आहे, सुरूवातीला या पार्क मध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु या पार्कची निगराणी राखण्याकरीता या पार्कमध्ये येण्यासाठी वेळ व प्रवेश शुल्क ठरवले जाईल, यामध्ये मनपाचा वतीने प्रत्येक व्यक्ती मागे ५ किवां १० रूपये शुल्क आकारण्यात येईल जेणेकरून या पार्कचे महत्व व काळजी राखली जाईल. pcmc
या पार्कमध्ये नागरिकासाठी क्लाइबिंग गेम्स, स्केटिंग , स्पेशल योगा सभागृह, मैदान असेल तसेच लहान मुलासाठी स्वतंत्र खेळणी असतील, तसेच प्रशस्त वॅाकीग ट्रॅक असेल हे योगा पार्क पिंपळे सौदागरच्या विकासत भर असणार आहे, तसेच या योगा पार्कमुळे नागरिकाना स्वतंत्र पार्कचा अनुभव घेता येईल… या पार्कचे काम लवकर पुर्ण करण्यात व हे पार्क लवकर खुले व्हावे, म्हणुन विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांनी वेळोवेळी मनपा विभागाकडे (pcmc) पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यास यश म्हणुन हे पार्क लवकरच जून महिना अखेरीस खुले होत आहे. pcmc yoga park


हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत
PCMC : पिंपळे सौदागर मधील योगा पार्क लवकरच नागरिकांसाठी खुला होणार