पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड मधील दिघी (DIGHI) हे अत्यंत महत्त्वाचे आहे उपनगर आहे. दिघीमध्ये नागरीकांसाठी कोणतेही विरंगुळा केंद्र किंवा किंवा करमणुकीचे, खेळाची साधने असलेले सर्वसमावेशक उद्यान तसेच विदयार्थी युवक, मुलांसाठी खेळाचे मैदान नाही. pcmc
अनेक वर्षापासून दिघीच्या दत्त डोंगरावर जेष्ठ नागरिक, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे तरुण या ठिकाणी सकाळी संध्याकाळी व्यायामासाठी येत असतात परंतु काही दिवसापासून आर्मी अथाँरिटीने सकाळी –संध्याकाळी दत्तडोंगरावर जाण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध केला आहे. दत्तडोंगर आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे दिघीकर नागरीकाबरोबरच, आर्मी, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे.
पिंपरी चिंचवड पालिकेने (PCMC) स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपल्या आरक्षित केलेल्या जागेवर सर्व सुख सोयींनीयुक्त असे सुसज्ज उद्यान उभारावे, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
त्यावेळी झालेल्या चर्चेत शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले की, जेष्ठ नागरिकांसाठी तसेच युवक, विद्यार्थ्यासाठी ओपन जिम, विरंगुळा केंद्र करमणुकीच्या साधना सह उद्यानाची निर्मिती करावी. उद्यानामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे मत मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे यांनी आयुक्तांना बरोबर चर्चा करताना म्हटले आहे.
यावर अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आरक्षित जागेची माहिती घेऊन ताबडतोब कार्यवाही करतो, असे आश्वासन दिले आहे.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला अध्यक्षा मीना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वीर,गजानन धाराशिवकर, पंडीत वनस्कर, बळवंत काळे, ऋषिकेश जाधव, अंकुश मुळे, विजय श्रीनाथ, अनिल सिंग, सागर थिटे, दीपक चव्हाण उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट
कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत