Monday, May 6, 2024
Homeजिल्हाChhatrapati Sambhajinagar : मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहाच्या शुल्क वाढीविरोधात एसएफआय आक्रमक; दिला इशारा

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहाच्या शुल्क वाढीविरोधात एसएफआय आक्रमक; दिला इशारा

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नुकताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील वसतिगृहाचे शुल्क अन्यायकारकरित्या ६० टक्क्याने वाढवण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा व हा निर्णय घेणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे एसएफआय ने म्हटले आहे.

एसएफआय ने म्हटले आहे की, विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणारा व विद्यापीठात शिक्षण घेणारा बहुतांश विद्यार्थी वर्ग हा शेतकरी,शेतमजूर,कामगार सर्वसामान्य गरीब पार्श्वभूमी असणाऱ्या घरातून येतो त्यामुळे यावर्षी मराठवाड्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे हे विद्यार्थी प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अर्थातच विद्यापीठ प्रशासनाने पालकत्वाच्या भूमिकेतून या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेण्याऐवजी विनाकारण वसतिगृह शुल्क वाढीचा घेतलेल्या निर्णयामुळे कुलगुरू, कुलसचिव व प्र- कुलगुरू या पदावर बसलेल्या व्यक्तींच्या हेतुवर शंका निर्माण होते. Chhatrapati Sambhajinagar

वसतिगृह शुल्क वाढीचा तुघलकी फतवा काढून NEP सारख्या विद्यार्थीहीत विरोधी षडयंत्रकारी शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सहायक ठरेल अशा पद्धतीने विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण करू इच्छिते व त्या माध्यमातून उच्च शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात उदासीनता निर्माण करून सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप एसएफआय ने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी वर्गाच्या संयमाचा अंत न पहाता त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करणारा अन्यायकारक वसतिगृह शुल्क वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करावाच त्यवबरोबर मराठवाड्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व वसतिगृह शुल्क तात्काळ माफ करण्यात यावे, अशी मागणी देखील एसएफआय ने केली आहे. अन्यथा येत्या सात दिवसात एसएफआय च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रसिद्धी पत्रकावर एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, राज्य सचिव मंडळ सदस्य पल्लवी बोराडकर, जिल्हा अध्यक्ष मनिषा बल्लाळ, जिल्हा सचिव गणेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक बोर्डे, मुनीर सय्यद, एसएफआय विद्यापीठ समिती अध्यक्ष अरूण मते, सचिव प्रिया झोरे, गणेश अलगुडे, प्रकाश वाव्हळे, कुलदीप कासार, अभिषेक शिल्पे, काजल खरात, रणजित वायसे, वैभव पालवे, प्रदीप चव्हाण, पवन मानवतकर, तेजस्विनी अस्के, अमृता मीते, शरद निळे, अतुल वानखेडे, निलेश वानखेडे, अंकुश साळवे, संकेत बलांडे, एकता राठोड आदींची नावे आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना

मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !

ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय