Wednesday, May 22, 2024
Homeआंबेगावब्रेकिंग : घोडेगाव येथे भीमाशंकर-कल्याण बसचा अपघात, बस पुलावरून पंधरा ते वीस...

ब्रेकिंग : घोडेगाव येथे भीमाशंकर-कल्याण बसचा अपघात, बस पुलावरून पंधरा ते वीस फूट ओढ्यात कोसळली

घोडेगाव : राज्यातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी नाशिक येथील सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघाताची घटना ताजी असताना आता भीमाशंकर-कल्याण बसच्या अपघाताची बातमी समोर येत आहे.

भीमाशंकर कडून कल्याणकडे निघालेल्या एसटी बसचा गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ हा अपघात झाला. गिरवली गावच्या पुढे अवघड वळणावर एसटी घसरली व गाडी कठडे तोडून पुलाच्या खाली गेली. त्यात ही बस उलटली. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. सर्वजण किरकोळ जखमी असून मोठी दुर्घटना टळली आहे. त्यांच्यावर घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, गिरवली गावचे सरपंच संतोष सैद व ग्रामस्थांनी खाजगी वाहने, रुग्णवाहिका यामध्ये घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचवले. यासोबतच जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, पाऊस पडत होता, वळणावर गाडी स्लिप झाल्यामुळे एसटी बस पुलावरून कोसळल्याचे वाहक प्रवीण भास्कर काकडे व चालक एस एच शेख यांचे म्हणणे आहे. मात्र या अपघाताचे नेमके कारण समोर आले नसून सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

हे ही वाचा :

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय