Saturday, April 27, 2024
Homeताज्या बातम्याBhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा बनले वडील

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा बनले वडील

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे वडील झाले आहेत. त्यांची पत्नी डॉ.गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) यांनी मुलीला जन्म दिला आहे. स्वतः भगवंत मान यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. भगवंत मान हे तिसऱ्यांदा वडील झाले आहेत. भगवंत मान यांनी सोशल मीडियावर हि माहिती शेअर केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती शेअर करताना म्हणाले की, मी बाप झालो असून घरी मुलीचा जन्म झाला आहे. तसेच आई आणि मूल दोघेही निरोगी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आज दुपारी १२ वाजता त्यांनी हि पोस्ट शेअर केली. २६ जानेवारी रोजी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लुधियानामध्ये रोझीला वडील होणार असल्याची माहिती दिली.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत यांचा विवाह ७ जुलै २०२२ रोजी डॉ. गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) यांच्याशी झाला. त्यांच्या लग्नाला आम आदमी पार्टीचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम अतिशय साधा ठेवण्यात आला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा उपस्थित होते.

सीएम मान यांच्या पत्नी गुरुप्रीत कौर या डॉक्टर आहेत. त्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील रहिवासी आहे. डॉ.गुरप्रीत कौर यांना रात्री उशिरा मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय