Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

PCMC : नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. २८ –  पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या कडेला तसेच नद्यांमध्ये राडारोडा टाकणारी  वाहने आणि वाहनचालक यांच्यावर महापालिकेच्या पर्यावरण  विभागाने दंडात्मक कारवाई करण्यात आली  आहे. PCMC NEWS

पिंपरी चिंचवड शहरातून मुळा,पवना आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या कडेला राडारोडा टाकत असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची  दखल घेत महापालिकेच्या (PCMC) पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन सापळा रचून सबंधित  सर्व वाहनचालकांवर आणि वाहनांवर कारवाई केली आहे.

शहरातील विविध भागांत दररोज ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो तसेच आर.एम.सी.प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशा वाहनांतून  नदीच्या कडेला राडारोडा टाकण्यात येत होता.  यामध्ये वाहनचालक  शिवा राठोड (वाहन क्र.के.ए.३३/टी.बी.२३२२), उमेश बारणे (वाहन क्र.एम.एच.१४/जे.एल.९०८५), वेदांत देसाई (वाहन क्र.के.ए.३३/के.ए.२१०५), आर.डी.वाघोले (वाहन क्र.एम.एच.१४/डी.एम.६४३२, एम.एच.१२/टी.एल.०८७२), तेजस उक्के (वाहन क्र.एम.एच.२०/सी.आर.२१९१,/एम.एच.१४/एल.ए.८३२८), प्रकाश चौधरी (वाहन क्र. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु.११४१), कांतीलाल खिरु पवार (वाहन क्र. एम.एच.१४/बी.एम.९८२) अशी एकूण ९ वाहने पकडून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा  दंड वसूल करण्यात आला. PCMC NEWS

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांच्यासह  गोरक्षनाथ करपे, स्वप्निल पाटील, पुष्पराज भागवत, प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे तसेच महाराष्ट्र सुरक्षा दल, मेस्को जवानांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नदीपात्रात भराव टाकल्यामुळे नदीपात्र अरूंद होत असून तसेच नदीप्रदूषण देखील होत आहे. त्यामुळे यापुढे नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या कारवाईसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नदीमध्ये भराव टाकणाऱ्या जागामालक, गाडी मालक, वाहन चालकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वाहनेही जप्त करण्यात येतील, याची नोंद सबंधितांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय