Friday, May 17, 2024
Homeआंबेगावमणिपूर हिंसाचार व आदिवासी महिलांवरील अत्याचाराचा सर्वपक्षीय निषेध

मणिपूर हिंसाचार व आदिवासी महिलांवरील अत्याचाराचा सर्वपक्षीय निषेध

घोडेगाव, दि.२५ : मणिपूर राज्यातील हिंसाचार व कुकी आदिवासी समुदायांतील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा आंबेगाव तालुका तहसील कार्यालय येथे, तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन देण्यात आले.

देशातील मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या या राज्यात मैतेई समुदायाचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या निर्णयावर त्या राज्यातील मैतेई व कुकी समुदायामध्ये मध्ये संघर्ष उभा राहिला आहे. त्यात घडलेल्या हिंसाचार, जातीय दंगलीत दि. ४ मे २०२३ रोजी मैतेई समुदायाने कांग्पोप्की जिल्ह्यातील बी फायनॉम गावात कुकी समुदायांच्या घरांवर हल्ला करून कुकी आदिवासींच्या दोन महिलांवर अत्याचार करून त्यांची गावामधून अक्षरशः नग्न धिंड काढुन त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले. हि घटना मानवतेला काळिमा फासणारी अतिशय निंदनीय घटना होती, या घटनेच्या निषेधार्त घोडेगाव तहसील कार्यालय समोर सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेनेचे (मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश भोर यांनी भाजपच्या धर्मांध राजकारणावर खडसून टीका करत, मणिपूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे अशोक काळे पाटील यांनी बोलताना भाजपाच्या धर्मांध राजकारणाचां पराभव करणेसाठी एकत्रित आले पाहिजे.

यासोबतच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ.अमोल वाघमारे यांनी मणिपूर हिंसाचार व महिला अत्याचाराचा निषेध करत, देशातील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व सामान्य जनतेने आत्ता पुढे येण्याची गरज आहे, असे नमूद केले.

All-party protest against Manipur violence and oppression of tribal women

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी मणिपूर घटनेचा निषेध करत असताना तालुक्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपा विरोधी सर्व पक्ष संघटना एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे अधोरेखित केले.

या निषेध मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, भारतीय काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जागर संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, सत्यशोधक बहुजन आघाडी, सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्था महाराष्ट्र राज्य, जनवादी महिला संघटना, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), महादेव ग्रुप, आदिवासी ठाकर संघर्ष समन्वय समिती इत्यादी पक्ष, संस्था व संघटना यांचा यामध्ये सहभाग होता.

यावेळी विविध पक्ष संघटनांचे खालील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये ऍड.अविनाश रहाणे, सुरेश भोर, देवदत्त निकम, डॉ.अमोल वाघमारे, राजु घोडे, अशोक पेकारी, प्रभाकर बांगर, प्रा.सुरेखा निघोट, ढवळा ढेंगळे, बुधाजी डामसे, अशोक काळे, अविनाश गवारी, अर्जुन काळे, कलावती पोटकुले, कमल बांबळे, प्रा.राजाराम बाणखिले, वैभव टेमकर, सचिन बगाडे, शिवाजी राजगुरू, विक्रांत भोर,प्रदीप हिले, बाळासाहेब बाणखिले, दिलीप पवळे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा :

संतापजनक : रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवर खाट बांधून नेला मृतदेह

…आता पोलीसही कंत्राटी; तब्बल ‘इतकी’ पदे भरण्याचा निर्णय

धक्कादायक : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे

गुजरात मध्ये महापूराचे थैमान, १०२ मृत्यूसह ४११९ जनावरे दगावली

ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, सिनेविश्वात शोककळा

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

नोकरीच्या बातम्या वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय