Friday, May 10, 2024
Homeराष्ट्रीयधक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

मणिपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर धगधगते आहे. मोठ्या प्रमाणावर मनिपुर मध्ये हिंसाचार बघायला मिळत आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता तेथील हिंसाचाराच्या व्हिडिओ समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाली होती. अशात स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मणिपूरमधील हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या समाजकंटकांनी ना महिलांना सोडलं ना मोठ्यांचा आदर केला. ज्या महिलेचे पती देशाच्या स्वातंत्र्यसाठी इंग्रजांविरुद्ध लढले, त्याच 80 वर्षीय महिलेला समाजकंटकांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इबेतोम्बी माईबी असे या महिलेचे नाव आहे.

स्वातंत्र्यसैनिक चुरचंद सिंग यांचे कुटुंब मणिपूरच्या ककचिंग जिल्ह्यातील सेरो गावात राहते. स्वातंत्र्यसैनिक दिवंगत चुरचंद सिंग यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची वृद्ध पत्नी घरात कुटुंबासोबत राहत होती. परिसरात हिंसाचार सुरू झाल्यानंतर इबेटोंबी यांनी कुटुंबातील सदस्यांना गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास भाग पाडले. त्यावेळी जमावाने त्यांना घरासोबत जिवंत जाळले. या घटनेचा थरारक अनुभव इबेतोम्बी माईबी यांच्या सून आणि नातीने सांगितला. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्ही या वृत्त संस्थेने दिले आहे.

हे ही वाचा :

धक्कादायक : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय