Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयधक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देशाच्या नागरिकत्वाबाबत एक धक्कादायक आणि एक गंभीर बाब समोर आलेली आहे. या वर्षी जूनपर्यंत भारतातील 87 हजार लोकांनी नागरिकत्व सोडले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली.

लोकसभा खासदार पी चिदंबरम यांनी परराष्ट्रमंत्र्यांना विचारले की, गेल्या तीन वर्षांत किती भारतीयांनी नागरिकत्व सोडले आहे? यानंतर, त्यांनी कोणत्या देशांचे नागरिकत्व घेतले आणि नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 12 वर्षांत सर्वाधिक आहे का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. जयशंकर म्हणाले 2011 पासून आतापर्यंत 17.5 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले असून यातील बहुतांश लोक अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात गेले आहेत.

परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की 2020 मध्ये 85 हजार, 2021 मध्ये 1.63 लाख आणि 2022 मध्ये 2.25 लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले होते. शिक्षण आणि नोकरीसाठी त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले असून अनेकजण आपल्या वैयक्तिक सोयीसाठी परदेशी नागरिकत्वास पसंती देत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत दिली.

हे ही वाचा :

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय