नवी दिल्ली : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे भारतातले सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. त्यांची 1,413 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर झाली आहे. तर एकीकडे पश्चिम बंगाल मधील निर्मल कुमार धारा या भाजप आमदाराकडे फक्त 1,700 रुपयांची संपत्ती आहे.
तर महाराष्ट्रातील भाजपाचे पराग शहा यांच्याकडे 500 कोटी रुपयांची मालमत्ता असलेले सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) चे विनोद भिवा निकोले यांच्याकडे 51 हजार 082 रूपये इतकी संपत्ती आहे. निकोले हे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार ठरले आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रेसी (ADR) या संस्थेने हा रिपोर्ट जारी केला आहे. भारतातल्या 28 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 4001 आमदारांच्या व्यापक अभ्यासानंतर हा रिपोर्ट तयार केला आहे. सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत काँग्रेस पक्षाचे 4 आणि भाजपचे 3 आमदार आहेत.
● सर्वाधिक संपत्तीधारक टॉप 10 आमदार
- डीके शिवकुमार (INC) – कनकापुरा, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता : रु. 1,413 कोटी
- केएच पुट्टास्वामी गौडा (IND) – गौरीबिदानूर, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता: रु. 1,267 कोटी
- प्रियकृष्ण (INC) – गोविंदराजनगर, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता: रु. 1,156 कोटी
- एन चंद्राबाबू नायडू (टीडीपी) – कुप्पम, आंध्र प्रदेश 2019 – एकूण मालमत्ता: 668 कोटी रुपये
- जयंतीभाई सोमाभाई पटेल (भाजप) – मानसा, गुजरात 2022 – एकूण मालमत्ता: 661 कोटी रुपये
- सुरेशा बीएस (INC) – हेब्बल, कर्नाटक 2023 – एकूण मालमत्ता: रु. 648 कोटी
- वायएस जगन मोहन रेड्डी (वायएसआरसीपी) – पुलिवेंदला, आंध्र प्रदेश 2019 – एकूण मालमत्ता: रु 510 कोटी
- पराग शहा (भाजप) – घाटकोपर पूर्व, महाराष्ट्र 2019 – एकूण मालमत्ता: रु 500 कोटी
- टी.एस. बाबा (INC) – अंबिकापूर, छत्तीसगड 2018 – एकूण मालमत्ता : रु 500 कोटी
- मंगलप्रभात लोढा (भाजप) – मलबार हिल, महाराष्ट्र 2019 – एकूण मालमत्ता: 441 कोटी रुपये
● सर्वात कमी संपत्तीधारक टॉप 10 आमदार
- निर्मल कुमार धारा (भाजप) – इंडस (SC), पश्चिम बंगाल 2021 – एकूण मालमत्ता: रु. 1,700
- मकरंदा मुदुली (IND) – रायगडा, ओडिशा 2019 – एकूण मालमत्ता: रु 15,000
- नरिंदर पाल सिंग सावना (आप) – फाजिल्का, पंजाब 2022 – एकूण मालमत्ता: रु. 18,370
- नरिंदर कौर भाराज (आप) – संगरूर, पंजाब 2022 – एकूण मालमत्ता: रु. 24,409
- मंगल कालिंदी (JMM) – जुगसलाई (SC), झारखंड 2019 – एकूण मालमत्ता: 30,000 रुपये
- पुंडरीकाक्ष्य साहा (AITC) – नवद्वीप, पश्चिम बंगाल 2021 – एकूण मालमत्ता: 30,423 रुपये
- राम कुमार यादव (INC) – चंद्रपूर, छत्तीसगड 2018 – एकूण मालमत्ता: 30,464 रुपये
- अनिल कुमार अनिल प्रधान (एसपी) – चित्रकूट, उत्तर प्रदेश 2022 – एकूण मालमत्ता: 30,496 रुपये
- राम डांगोरे (भाजप) – पंधाना (ST), मध्य प्रदेश 2018 – एकूण मालमत्ता: 50,749 रुपये
- विनोद भिवा निकोले (CPI(M))- डहाणू (ST), महाराष्ट्र 2019 – एकूण मालमत्ता: रु 51,082