Tuesday, May 14, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज २०२४-२५ चा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. Shiv Museum Junnar

आज मांडलेल्या अर्थसंकल्पात मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटक व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. वडज, ता.जुन्नर, जि.पुणे येथे जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन १६.८९ हेक्टर आर् मध्ये हे काम होणार असून या माध्यामातून त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची माहिती त्यांनी केलेल्या कार्याची संक्षिप्त माहिती पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे.

या सोबतच 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे. याशिवाय, अयोध्येत रामजन्मभूमीत महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. जम्मू काश्मीर मध्येही महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दरम्यान, अजित पवारांनी राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतांना हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्यांसाठी सादर केला जात असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

मोठी बातमी : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय