Saturday, October 12, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या...

मोठी बातमी : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज २०२४-२५ चा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला.यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांनी केलेल्या मोठ्या घोषणा

– मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय

– राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणांची अमंलबजावणी

– स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत

– विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी

– पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी

– जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपये

– रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपये, मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येतं आहे. ⁠

– संजय गांधी निराधार योजनेत 1000 वरुन 1500 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. 

– ⁠रेडीओ क्लब जेटीसाठी 227 कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे.

– शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषीपंप योजना राबवण्यात येणार, 8 लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. 

– 40 टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे. 

– 37 हजार आंगणवाडींना सौर उर्जा दिली जाणार आहे. 

– एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल. 

– महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे. मुलींना 18 वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येईल. 

– आशियाई स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंच्या पारितोषिकामध्ये 10 पट वाढ करण्यात आली आहे. 

– सुवर्णपदाकासाठी एक कोटी रुपये रौप्य पदकासाठी 75 लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी 50 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येत आहेत.

हेही वाचा :

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

संबंधित लेख

लोकप्रिय