Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्यायूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या आयटी सेलचा व्हिडिओ रिट्विट केल्याबद्दल माफी मागितली आहे. केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात कबूल केले की यूट्यूबर ध्रुव राठी यांनी भाजप आयटी सेलबद्दल तयार केलेला व्हिडिओ रिट्विट करणे ही माझी चूक होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आपली चूक मान्य केली आहे. केजरीवाल यांनी 2018 मध्ये YouTuber ध्रुव राठीचा कथित बदनामीकारक व्हिडिओ रीट्विट केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध मानहानीचा आरोप करण्यात आला होता. मानहानीचा हा खटला रद्द करण्याची विनंती
केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

युट्यूबर ध्रुव राठीच्या व्हिडिओ मध्ये विकास सांकृत्यन नावाच्या व्यक्तीबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. ही व्हिडिओ केजरीवाल यांनी रिट्विट केल्याने केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने हाच व्हिडिओ रिट्विट केल्याबद्दल दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात जारी केलेले समन्स कायम ठेवले होते. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना ट्विटरवर मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात, असे म्हणत हे प्रकरण रद्द करण्यास नकार दिला होता. तक्रारदाराच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची पडताळणी न करता, त्याने ते रिट्विट केले आणि करोडो लोकांपर्यंत पोहोचवले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलाने चूक मान्य केल्यावर कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला तूर्त स्थगिती दिली.

हेही वाचा :

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

संबंधित लेख

लोकप्रिय