Monday, May 13, 2024
Homeताज्या बातम्याएका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

मुंबई : शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांना अभिमानाने सांगितलेला एक किस्सा अडचणीचा ठरला आहे. एका स्थानिक वृत्त माध्यमांशी बोलताना त्यांनी वाघाच्या शिकारी बाबत बोलल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. MLA Sanjay Gaikwad

आमदार संजय गायकवाड शिवजयंतीच्या दिवशी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संजय गायकवाड यांनी स्वत: मी 1987 रोजी वाघाची शिकार केली होती. त्याचा दात गळ्यामध्ये बांधला होता. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असं आमदार संजय गायकवाड यांनी अभिमानाने सांगितले मात्र याची वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

पत्रकाराने गळ्यामधील दाताविषयी प्रश्न विचारला असता ‘माझ्या गळ्यामध्ये वाघाचा दात आहे. त्या वाघाची मी मी शिकार केली होती. असे ते म्हणाले होते. त्यांची ही मुलाखत व्हायरल झाली. या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्यानुसार आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या सोबतच हा दात जप्त करत प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तीन वर्षांच्या सश्रम कारावास होऊ शकतो.

हेही वाचा :

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

ब्रेकिंग : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना, आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळ

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय