Saturday, April 13, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी...

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात विधान परिषदेतून महत्वाची बातमी येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंङीर आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन काल पासून सुरू झाल्याने त्याचे अधिवेशनातही पडसाद उमटताना दिसत आहे.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत बोलताना ‘मनोज जरांगे पाटील यांच्यावर’ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

या सोबतच भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, हे आम्ही शोधून काढू असं म्हणत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील जरांगे यांची एसआयटी चौकशी होणार, यावर शिक्कामोर्तब केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी माझी एसआयटी चौकशी बिनधास्त करा, असे म्हणत मला गुंतविण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे असा आरोप केला.

हेही वाचा :

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय