Sunday, May 19, 2024
Homeजिल्हामराठा समाज बांधवांवर अमानुष लाठी हल्याचा जाहीर निषेध – आम आदमी पक्ष 

मराठा समाज बांधवांवर अमानुष लाठी हल्याचा जाहीर निषेध – आम आदमी पक्ष 

खेड : हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर राजगुरुनगर येथे खेड, आंबेगाव तालुका आम आदमी (आप) पक्षाच्या वतीने जालना येथील अंतरवाली सराटी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेने उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर अमानुष लाठी हल्याचा जाहीर निषेध करून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. Aam Aadmi Party publicly condemns inhuman lathis on Maratha community members

मंगळवार दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू पुतळ्यासमोर खेड, आंबेगाव तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने जालना येथील मराठा आरक्षण मागणी करणाऱ्या उपोषणकर्त्यांवरील अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. हुतात्मा राजगुरू पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून/ पूजन करून निषेधास सुरुवात झाली. जमाबंदीमुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हे निदर्शन आंदोलन करण्यात आले. व मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यात आला.

हुतात्मा राजगुरू पुतळ्यांच्या समोर पुणे नाशिक रस्त्यालगतच्या परिसरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला. व मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. जालना येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवरील हल्ल्याचा निषेध असो, उपोषण कर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, एक मराठा !लाख मराठा!, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, भ्याड हल्ल्या संदर्भातीलदोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देत भ्याड हल्ल्याचा “जाहीर निषेध” करण्यात आला.

या जाहीर निषेध कार्यक्रमासाठी आम आदमी युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र मयूर दौंडकर, नितीन सैंद, विठ्ठल परदेशी, अनिल भोर, सलीम इनामदार, बाळासाहेब तांबडे, वैभव टेमकर, अशोक गारगोटे, स्वप्निल दौंडकर, दत्ताभाऊ ढेरंगे, इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय