Amethi : उत्तर प्रदेशातील अमेठी येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करून गोंधळ घातला. या काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात काँग्रेसचे चार कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
अमेठीमध्ये (Amethi) रविवारी रात्री उशिरा काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. अमेठीचे काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेत असताना रविवारी रात्री १२.४५ च्या सुमारास हा हल्ला झाला. काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयातून बाहेर येताच हल्लेखोर पळून गेले. या घटनेने काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अनिल सिंह यांनी भाजपवर हल्ला केल्याचा आरोप करत सर्व काही पोलिसांसमोर घडले. पोलिसांनी फक्त बघ्याची भुमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा निषेध करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच वेळी आंदोलन सुरू केले.
सीओ सिटी मयंक द्विवेदी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन द्विवेदी यांनी दिले आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Amethi काँग्रेसचे उमेदवार
अमेठीतून काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार असताना किशोरीलाल हे त्यांचे खासदार प्रतिनिधी होते. किशोरीलाल शर्मा यांना गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जाते.
हे ही वाचा :
‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान
भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका
अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे