बारामती (पत्रकार/ रत्नदीप सरोदे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यातर्फे बारामती येथील लेंडी पट्टी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांगता सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यासाठी खासदार अमोल कोल्हे, रोहित पवार ,खासदार सुप्रिया सुळे खासदार शरदचंद्रजी पवार, अनिल देशमुख, कराळे मास्तर तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची वेळ दुपारी 1 वाजता होती मात्र सभा 4 वाजता सुरू झाली. सर्वात प्रथम स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. यंदाची निवडणूक चुरशीची असल्यामुळे बारामतीतील खेडेगावातून विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर या सभेसाठी एकत्रित जमा झाला होता.Supriya sule
त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भारदस्त भाषण शैलीचा वापर करत शेतकरी कष्टकरी मायबापाच्या कष्टाचे जाणीव करून दिली. ते म्हणाले याच देशात जय जवान जय किसानसा नारा प्रसिद्ध आहे त्या देशाचे दुर्दैव असं की एक मुलगा सियाचीन मध्ये देशासाठी लढतोय आणि बाप हा तीन काळया कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरती अश्रुदुराच्या नळकांड्या, पाण्याचा फवारा सहन करत होता. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा जर कृषिमंत्री कोणी पाहिला असेल तर ते साक्षात शरद पवार हे आहेत. मतदानाला जाताना घरातील गॅस सिलेंडरला 3 वेळा नमस्कार करा कारण गेल्या दहा वर्षात त्याची किंमत तिप्पट झाली. आहे. तसेच खताच्या पिशवीला देखील 3 वेळा नमस्कार करा कारण तिच्या किमती देखील तिप्पट आहेत. मतदान करताना 3 नंबरच्या तुतारीला करा. असा कानमंत्र खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीकरांना दिला.Supriya sule
त्यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. ईडी आणि इतर यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे. भाजपच्या नेत्यांना शरद पवारांना संपवायचे आहे ,मात्र शरद पवार हे लोकांच्या हृदयामधला काळजाचा तुकडा आहेत, त्यांना संपवणे शक्य नाही. असे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला. बारामती ॲग्रो सारख्या साखर कारखान्यावर चुकीच्या पद्धतीने प्रहार करून चौकशांचा ससेमीरा माझ्या मागे लावला, मात्र मी शरद पवारांसोबत कायम ठामपणे उभा राहिलो. पवार साहेबांना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना उत्तर देताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. खऱ्या अर्थाने लोकांना भावनिक साद देत रोहित पवारांनी बारामतीकरांची मने जिंकून घेतली.Supriya sule
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज देशातल्या कृषी मंत्र्याचे नाव सुद्धा लोकांना माहिती नाही .आजही लोक शरद पवार हेच कृषिमंत्री आहेत असे म्हणतात. ही त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे. कांद्याच्या प्रश्नावर, दुधाच्या प्रश्नावर सत्तेत बसलेले लोक बोलत नाहीत ,मात्र त्यावर आम्ही आवाज उठल्यावर आम्हाला संसदेतून निलंबित केलं जातं. ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही आणि त्याला उत्तर तुतारीचे बटन दाबूनच देता येईल असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. संसद रत्न पुरस्कारावर बोलताना त्या म्हणाल्या हा पुरस्कार देणारे भाजप सरकार आहे. मला मेरिटच्या बेसिसवर निवडून द्या. कौटुंबिक नातेसंबंधावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या ,दादांना आम्ही खऱ्या अर्थाने सन्मान दिला. दादा जे म्हणतील त्यानुसार आम्ही निर्णय घेतले .मात्र स्वतःचे साम्राज्य वाचवण्यासाठी त्यांनी चुकीच्या लोकांना निवडलं. घरातील ज्येष्ठ माणूस हा वटवृक्षा सारखा असतो, आणि त्या वटवृक्षाला खूप पारंब्या असतात. एक-दोन पारंब्या कापल्या म्हणून वटवृक्षाला काहीच फरक पडत नाही. अशा भाषेत अजितदादांचा समाचार त्यांनी घेतला. सुप्रिया, शरद, अमोल, रोहित, तुतारी ,गुलाल, विजय अशी 3 अक्षरे यमक जुळवत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.Supriya sule
खासदार शरद पवार म्हणाले, देशामध्ये हुकूमशाहीचे वातावरण निर्माण केले जात आहे. महाविकास आघाडीला मतदान करून लोकशाही स्थापन करणाऱ्या तसेच संविधान जपणाऱ्या वृत्तींना सत्तेत पाठवणे हेच तुमचे कर्तव्य आहे. त्याकरता तुतारीचे बटन दाबून सुप्रिया सुळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
हे ही वाचा :
भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका
अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे
ब्रेकिंग : माजी मंत्री एचडी रेवण्णा यांना अटक, एसआयटीची मोठी कारवाई
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन
धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना
ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस