Raj Thackeray : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील मनसेचे वरिष्ठ नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पक्षाला रामराम ठोकत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आज (15 नोव्हेंबर) नाशिकमधील जाहीर सभेत अशोक मुर्तडक अधिकृतपणे ठाकरे गटात सहभागी होणार आहेत. मुर्तडक यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे.
अशोक मुर्तडक विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, मनसेने प्रसाद सानप यांना उमेदवारी दिल्यामुळे मुर्तडक नाराज झाले होते. अशोक मुर्तडक यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरे गटात सामील होण्याचा मार्ग स्वीकारला.
मनसेसाठी हे फक्त एकच धक्का नाही. यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पक्ष सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. नुकतेच अखिल चित्रे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे कीर्तिकुमार शिंदे, निलेश जंगम आणि पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही मनसेचा त्याग करून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे नाशिकसह राज्यातील राजकारण तापले आहे. आगामी निवडणुकीत याचा नेमका काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Raj Thackeray
हेही वाचा :
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य