Sunday, December 8, 2024
Homeराजकारणदिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

Aditya Thackeray : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दापोलीतील सभेत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. “सरकार आलं की मी यांना बर्फावर झोपवतो,” असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना कडव्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं असून दिशा सालियन प्रकरण पुन्हा काढण्याचा इशारा दिला आहे.

रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, “तू रात्री बारा वाजता जातोस, सकाळी पाच वाजता येतोस,तुझे धंदे काय? हे सगळे समजले पाहिजे, मी दिशा सालियन प्रकरण पुन्हा उघडणार आहे,” असे गंभीर विधान केले.

कदम यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना, “तुझं वय किती आणि कोणाबद्दल काय बोलतोस याचं भान ठेव. लादीवर झोपायच्या गोष्टी करू नकोस. तुमचं पक्षासाठी योगदान काय?” असा सवाल केला.

रामदास कदम यांनी केवळ आदित्य ठाकरेंनाच नाही तर उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केले. “राज ठाकरे आणि नारायण राणे पक्ष सोडून गेले, तेव्हा तुझ्या बापाला माझ्या गाडीत पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीवरून खाली उतरता येत नव्हतं,” अशी टीका त्यांनी केली.

“काका म्हणत माझ्या माझ्याकडून शिकून घेतलं आणि तू माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. “पर्यावरण खातं माझ्याकडून घेतलं आणि पाठीत खंजीर खुपसलास. गद्दाराची भाषा बोलू नकोस. गद्दारी तुम्ही केली आहे,” गद्दार तू आहेस; असे रामदास कदम म्हणाले.

कदम यांनी शिंदे सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत, “महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी पहिल्या एक वर्षात कोकणसाठी भोपळाही दिला नाही. पण शिंदे सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी कितीही कावकाव केली तरी योगेश कदम 50,000 मतांनी निवडून येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वादाने महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून, आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय