Monday, May 20, 2024
Homeराजकारण“तुझा लवकरच दाभोळकर होणार” नव्या धमकीने राज्यात खळबळ

“तुझा लवकरच दाभोळकर होणार” नव्या धमकीने राज्यात खळबळ

मुंंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले कि, पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल.

तसेच पुढे ते म्हणाले, पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही. पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटले आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


नोकरी संबंधित बातम्या :

पुणे महानगरपालिका अंतर्गत 447 पदांसाठी भरती; 8वी, 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड., बी.एड. धारकांना नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय