Sunday, May 19, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राजकीय वर्तूळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. असे असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटले आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

फेसबुकवरील राजकारण महाराष्ट्राचे या पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. ‘शरद पवार भाडखाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. या प्रकरणाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

यावेळी सोशल मीडियावर आलेल्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलिस आयुक्तांना देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा :

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


नोकरी संबंधित बातम्या :

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय