Wednesday, April 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड'आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत', आव्हाड म्हणाले, 'धार्मिक गोष्टींच्या राजकारण...'

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पुणे : ‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, सरकारचे काडीमात्र लक्ष नसून,धार्मिक गोष्टींच्या राजकारणावर ही सत्ताधारी मंडळी जास्ती लक्ष केंद्रित करून आहेत.कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी लोक धार्मिक बाबींवर राज्यातील वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.आव्हाड यांनी ट्विट करत सरकार हल्ला चढवला आहे.

आव्हाड ट्विट मध्ये म्हणतात, “काल मुंबईत एका 18 वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. आज त्याच मुंबईमध्ये एका 36 वर्षीय महिलेला मारण्यात आले. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्या तुकड्यांना कुकर मध्ये शिजवण्यात आले. त्यानंतर त्या शिजवलेल्या तुकड्यांना मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट बनवून त्याची आरोपीने जागोजागी विल्हेवाट लावली. आरोपीचं नाव मनोज सहानी.

ते पुढे म्हणतात, ‘महिलांची सुरक्षितता ही अत्यंत धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे राज्यात.आपल्या आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत ही गोष्ट वारंवार सिद्ध होते आहे. परंतु याकडे या सरकारचे काडीमात्र लक्ष नसून,धार्मिक गोष्टींच्या राजकारणावर ही सत्ताधारी मंडळी जास्ती लक्ष केंद्रित करून आहेत.कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी लोक धार्मिक बाबींवर राज्यातील वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही केला आहे.

महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं. या राज्यात महिलांना मोकळ्या हवेत श्वास घेता येईल, त्या भयमुक्त राहतील हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी


पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 171 पदांची भरती; 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय