Monday, September 25, 2023
Homeशहरखासदार सुप्रिया सुळे यांची आळंदी मंदिरास सदिच्छा भेट  

खासदार सुप्रिया सुळे यांची आळंदी मंदिरास सदिच्छा भेट  

आळंदी/अर्जुन मेदनकर : श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी स्थळाचे दर्शन घेतले. माऊलींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात येऊन समाधान वाटल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

  या प्रसंगी खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील,चेअरमन अनिकेत कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊली वीर, श्रींचे पुजारी मुरलीधर प्रसादे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. माऊली मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात खासदार सुळे यांचा आळंदी देवस्थान चे वतीने सत्कार करण्यात आला. श्री क्षेत्र आळंदी येथे गाथा परिवारातर्फे आयोजित कीर्तन व प्रवचन प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी श्रवणीय हरी कीर्तनाचा लाभ त्यांनी घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, गाथा परिवाराचे संस्थापक ह.भ.प उल्हास पाटील, माजी आमदार राम कांडगे, प्रा.अर्जुन कोकाटे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, चेअरमन अनिकेत कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा कुऱ्हाडे, शहराध्यक्षा रुपाली पानसरे, तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे यांच्यासह वारकरी व आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. गाथा परिवाराचे वतीने आयोजित कीर्तन, प्रवचन प्रशिक्षण शिबिराची सांगता उत्साहात झाली.

संबंधित लेख

 


लोकप्रिय