Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत अंकुर आयुर्वेद फर्टिलिटी सेंटर तर्फे मोफत आरोग्य शिबीर

आळंदीत अंकुर आयुर्वेद फर्टिलिटी सेंटर तर्फे मोफत आरोग्य शिबीर

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री साई हॉस्पिटलच्या २२ वा वर्धापनदिन व अंकुर आयुर्वेद व फर्टिलिटी सेंटरचे उदघाटना निमित्त मोफत स्त्रीरोग तपासणी आरोग्य शिबीर उत्साहात आयोजित करण्यात आले. या शिबिरात सर्व वयोगटातील ५२ महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. २० महिलांची रक्त तपासणी करण्यात आल्याचे संयोजक डॉ. ज्योती माटे यांनी सांगितले.


या प्रसंगी डॉ. उत्तम माटे, कमलेश खैरनार, साई हॉस्पिटल चा स्टाफ उपस्थित होते. यावेळी डॉ ज्योती माटे म्हणाल्या, बदलत्या जीवनशैली मुळे स्रियांमध्ये पीसीओडी , वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी व इतर अशा आजारांचे प्रमाण वाढले आहे. अंकुर आयुर्वेद व फर्टिलिटी सेंटर मध्ये अशा महिलांना आयुर्वेद व मॉडर्न दोन्ही पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. या क्षेत्रातील २६ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी सांगितले. शिबिरासाठी डॉ उत्तम माटे, कमलेश खैरनार यांचेसह साई हॉस्पिटल चा स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय