Friday, April 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास वैभवी कोठी सज्ज, तात्पुरत्या दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास वैभवी कोठी सज्ज, तात्पुरत्या दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात

माऊलींचे पालखी सोहळ्याचे ११ जूनला प्रस्थान

आळंदी / अर्जुन मेदनकर
: माऊलींचे पायी वारी पालखी सोहळा आषाढी यात्रेस राज्यासह परिसरातून आळंदीत खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशी माळ, कपाळी बुक्का अन् मुखाने हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविक असतात.यावर्षीचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून ११ जून ला हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे. इंद्रायणी नदी घाटालगत तात्पुरत्या स्वरूपात दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगिततले.

आळंदीतील विविध शासकीय खात्यांसह आळंदी देवस्थान मध्ये भाविक, वारकरी यांचे सेवा सुविधा देण्याचे तयारीने आळंदीत विविध आघाड्यावर वेग घेतला आहे. माऊलींचे आषाढी पायी वारीचा प्रस्थान सोहळा अनुभवण्यासह नेत्रात साठविण्यासाठी राज्य परिसरातून लाखो भाविक हरिनाम गजर करीत दिंड्या-दिंड्यातून आळंदीत दाखल होत असतात. यावर्षीही अधिकचे भाविक यात्रेत सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्याप्रमाणे आळंदी प्रस्थान काळात आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना देखील गैरसोयीस सामोरे जावे लागू नये यासाठी नियोजन प्रमाणे तयारी केली जात आहे. यासाठी आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्था, आळंदी पोलीस, महसूल यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन नियोजन केले जात आहे.



प्रस्थान काळात मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट, प्रदक्षिणा मार्ग तसेच अधिक वर्दळीची ठिकाणे येथे प्रभावी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले असून भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय प्रस्थान यात्रा काळात आळंदीत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी भाविक, वारकरी, स्थानिक नागरिक, कामगार यांची वाहने पास पाहून सोडली जाणार आहेत. इत्तर सर्व प्रकारच्या वाहनांना ७ ते १२ जून या काळात आळंदीत पूर्णपणे बंदी रहाणार आहे. यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, रमेश पाटील यांनी नियोजन प्रमाणे बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

आळंदीत भाविकांची गर्दी होऊ लागली असून तीर्थक्षेत्रात मठ, मंदिर, धर्मशाळा आणि शाळेच्या मैदानासह इंद्रायणी नदी लगत धर्मशाळांत भाविक – वारकऱ्यांच्या विना, टाळ – मृदंगाचा त्रिनाद आणि नामजयघोष, हरिनामाचा गजर होताना दिसत आहे. परंपरेने सप्ताह सुरु झाला असून हरिनाम गजर धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत. आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांचे मार्गदर्शनात आरोग्य सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माऊली मंदिरात श्रीचे दर्शन घेण्यास भाविक गर्दी करीत असून सोहळ्या पूर्वी दर्शन घेण्यास भाविकांची गर्दी दर्शनबारीत दिसत आहे.

आळंदी नगरपरिषदेने नगरप्रदक्षिणा मार्गावरील तसेच शहरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली असून भाविकांची प्रस्थान काळात गैरसोय होऊ नये यासाठी प्रदक्षिणा मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्याचे शिवधनुष्य मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी उचलले असून त्यांना वाहतूक पोलीस सहकार्य करीत असून आळंदीत अतिक्रमण हटाव मोहिमेने गती घेतली आहे. बांधकाम अभियंता सचिन गायकवाड आणि सहकारी अतिक्रमण हटाव मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.

आळंदीतून अवजड वाहनांना बंदी असून सोहळ्यातील वाहना शिवाय इतर वाहनाने प्रवेश बंद असल्याने रस्त्यावर रहदारी चा त्रास भाविकांना होणार नाही याची दक्षता आषाढी यात्रेतील नियोजना वरील पोलीस घेताना दिसत आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने गॅस सिलिंडर पुरेशा प्रमाणात व्यवस्था राहील यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने विविध नागरी सेवा सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा, वीज, पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. आळंदी शहरात शांतता, सुव्यवस्था आणि चोऱ्या रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, आळंदी पोलीस यांच्या वतीने तीर्थक्षेत्री कॅमेरे लावण्यात आले असून यावर सतत नियंत्रण ठेवले जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

माऊलींचा पालखी सोहळा रविवारी ( दि.११) मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो संख्येने भाविक आळंदीत दाखल होत असून आळंदी पालिका, देवस्थान भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांचे नियंत्रणात सोहळा सज्ज होत आहे.

पोलीस अधीक्षक विनय चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, गृहरक्षक दल,पुरुष, महिला पोलीस कर्मचारी,राज्य राखीव पोलीस दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके,साध्या वेशातील, तसेच वारकरी वेशातील पोलीस आणि पोलीस मित्र देखील तैनात करण्यात येणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यातून भाविक नागरिकांचे सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येणार आहे. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ आळंदी, निर्मल वारी, माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. शहरात स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, वीज पुरवठा नियमित राहील यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. वीज पुरवठा नियमित व्हावा यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली असल्याचे वीज कनिष्ठ अभियंता सुभाष धापसे यांनी सांगितले.

माऊली मंदिरात व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, संजय रंधवे, ज्ञानेश्वर पोंदे, श्रीकांत लवांडे, सोमनाथ लवंगे यांचे मार्गदर्शनात तयारी केली जात आहे. यासाठी कार्यरत कर्मचारी मंदिर परिसरात काम करीत असून तयारीने वेग घेतला आहे. श्रींचे पूजा साहित्य, सोन्या चांदीचे वस्त्रालंकार, भांडी, पॉलिश देखील करण्यात आली आहेत. माऊली मंदिरातील कोठी हजारो वस्तूंचे जमवा जमविणें सजली असून यावर्षी नवीन कपाटे आणि २०० लिटर्स चा फ्रीज देखील कोठीत राहणार असल्याचे तुकाराम माने यांनी सांगितले. यावर्षी आळंदी ग्रामस्थ तुळशीराम भोसले, रोहित भोसले यांची बैलजोडी श्रींचा रथ ओढणार असून त्यासाठी रथाची देखभाल दुरुस्ती नंतर रथाला बैलजोडी जुंपून सर्व देखील यशस्वी झाला असल्याचे माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय