Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याSushilkumar Pawara: सुशिलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sushilkumar Pawara: सुशिलकुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sushilkumar Pawara: नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आज २५ एप्रिल २०२४ रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी नंदूरबार मनिषा खत्री यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.

त्यावेळी सुशिलकुमार पावरा (Sushilkumar Pawara) यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, नंदूरबार लोकसभा क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करणे, रस्ते खड्डेमुक्त करणे, व्यसनमुक्त करणे, १०० पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, ५ वी, ६ वी अनुसूचि लागू करणे, १०० वनदावे मंजूर करणे, डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे अशी अनेक उद्देश समोर ठेऊन आम्ही ही निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, भाजप व काँग्रेस उमेदवारांचे अद्याप निवडणूकीचे ध्येय ठरलेले नाहीत. पक्षाच्या केंद्रीय कमिटीने ठरविलेले जाहीरनामे व्हाटसऍपवर शेअर केले जात आहे. नंदूरबार लोकसभा क्षेत्रासाठी भाजप व काँग्रेसचे निश्चित ध्येय नसल्याची टीकाही पावरा यांनी केली.

काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व भाजपच्या उमेदवार हिना गावित हे निवडणूक पूर्वीच बॅन्ड वाजे आणून गाजावाजा करत आहेत. यांनी आधीच सर्व सामान्य जनतेचे बॅन्ड वाजवले आहेत. काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी धडगांव व अक्कलकुवा भागात ३५ वर्षांत भंगार रस्ते करून ठेवलेत. भाजपच्या हिना गावित नंदूरबार शहर ठिकाणी राहतात, तिथेही अद्याप कोकणीहील सारख्या भागात रस्ते झाले नाहीत, शहरातील रस्ते खराब आहेत. त्यामुळे नंदूरबार  लोकसभा क्षेत्रातील जनता मतदानाच्या माध्यमातून भाजप व काँग्रेस उमेदवारांची बॅन्ड वाजवणार आहेत. आम्हीही यांचा आता बॅन्ड वाजवणार आहोत. ही निवडणूक नक्कीच आम्ही जिंकू. अशी प्रतिक्रिया बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय