Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याNagpur Loksabha : नितीन गडकरी यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा ‘हा’ उमेदवार

Nagpur Loksabha : नितीन गडकरी यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा ‘हा’ उमेदवार

Nagpur Loksabha : काँग्रेसने राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी (Congress Loksabha candidate list) जाहीर केली आहे. यात काँग्रेसने राज्यातील 4 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात एकूण ४५ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसकडून जाहीर विदर्भातील चार उमेदवार जाहीर केले आहेत. तर नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांना उमेदवारी दिली आहे.

नागपूर लोकसभा (Nagpur Loksabha) ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसने जाहिर केलेल्या दुसऱ्या यादीत नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांना उमेदवारी दिली आहे. नितीन गडकरी यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर काँग्रेसने विकास ठाकरे यांना गडकरींविरोधात मैदानात उतरवले आहे.

कोण आहेत विकास ठाकरे ?

विकास ठाकरे (Vikas Thackeray) हे काँग्रेसचे नागपूर पश्चिम (विधानसभा मतदारसंघ) आमदार आहेत. तसेच ते नागपूरचे महापौरसुद्धा राहिलेले आहेत. नागपूर शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष देखील ते राहलेले आहे.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांना मैदानात उतरले होते. मात्र, नाना पटोले यांचा तब्बल २ लाख ८४ हजार मतांनी पराभव झाला होता.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

संबंधित लेख

लोकप्रिय