Friday, November 22, 2024
HomeNewsउड्डाणपुलाचे काम चालू असताना लॉन्चर कोसळला

उड्डाणपुलाचे काम चालू असताना लॉन्चर कोसळला

चिपळूण : शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील उड्डाण पुलाचे गर्डर बसविण्यासाठी उभारलेल्या लॉंचरचे खांब शनिवारी दुपारी अचानक निसटले. वेळीच हा प्रकार निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी काम तातडीने थांबवून तेथील कामगारांना तात्काळ हटवण्यात आले. तर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील दुकानं बंद केली. The launcher collapsed while the flyover was in progress

चिपळूणमध्ये महामार्ग चौपदरीकरणातील १.८० किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याचे काम सुरु आहे. या कामाची चाचणी घेतल्यानंतर तात्काळ गर्डर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

शहरातील बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पुढेपर्यंत हा पूल उभारला जाणार आहे. साधारण या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे ४६ पिलरचे काम पुर्णत्वास गेले आहे. त्यानंतर आता सर्व्हिस रोडसह गर्डरच्या कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. गर्डरच्या कामासाठी अत्यावश्यक असलेली महाकाय यंत्रणा बहादूरशेखनाका येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम त्याद्वारे गर्डरच्या कामाची चाचणी घेतली. सुमारे ८०० गर्डर या पुलावर उभारले जाणार आहेत. त्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जाणार आहे.

चिपळूणच्या ४६ पिलरसाठी कोंडमळा येथे तयार स्थितीत असलेले ८० टनी गर्डर ४८ चाकी हायड्रोलिक ट्रेलरने येथे आणून १५० टनी क्रेनच्या सहाय्याने बसवले जात आहेत. आतापर्यंत तीन खांबांपर्यंत गर्डर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु हे गर्डर उभारतासाठी लोखंडी लॉंचर रचना केली आहे. या लॉंचरचा काही भाग पुढे ढकलताना त्याच्या पुढील भागांतील चार खांब अचानक निसटले. त्यामुळे भयभीत झालेल्या कामगारांनी तातडीने काम थांबवले. 

त्यानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मागवून वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी बहादूरशेख नाका येथे एकेरी मार्गावर वाहतूक सुरु केली. त्यामुळे काही तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

SSC : कर्मचारी निवड आयोग मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या 1114 जागांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती

Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज

The launcher collapsed while the flyover was in progress
The launcher collapsed while the flyover was in progress
संबंधित लेख

लोकप्रिय