Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्वच मतदारसंघांवर उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आज वंचितने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईच्या तीन जागांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई उत्तरच्या जागेसाठी बीना सिंह यांना तर मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
यासोबतच रायगड लोकसभा मतदार संघातून कुमुदिनी रविंद्र चव्हाण, उस्मानाबाद मतदारसंघातून भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, नंदुरबारमधून हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी, जळगावमधून प्रफुल कुमार रायचंद लोढा, दिंडोरी लोकसभामधून गुलाब मोहन बर्डे, पालघरमधून विजय म्हात्रे तर भिवंडीमधून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !