Wednesday, August 17, 2022
Homeकृषीब्रेकींग : सोयाबीन दरात मोठी घसरण, 27 सप्टेंबर रोजी किसान सभेची आंदोलनाची...

ब्रेकींग : सोयाबीन दरात मोठी घसरण, 27 सप्टेंबर रोजी किसान सभेची आंदोलनाची घोषणा

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मुंबई : 27 सप्टेंबर रोजी सोयाबीन तहसील कार्यालयात ओतून केंद्र सरकारचा राज्यभर निषेध करणार असल्याची घोषणा अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.

सोयाबीनचे दर 11 हजार 111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेने घेरले गेले आहेत. 

हेही वाचा ! कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. संदिप ठाकरे यांना इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड पुरस्काराने केलं सन्मानित

केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. 

27 सप्टेंबर रोजी राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. त्याच दिवशी मोदी सरकारच्या शेतकरी धोरणांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

शेतकऱ्यांनी कोसळलेल्या दराला घाबरून जाऊन पॅनिक सेलिंग करू नये. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता सोयाबीनला चांगला दर नक्की मिळेल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करताना संयम ठेवावा. आपला माल बाजारात आणताना काही टप्पे करावेत. चांगला दर मिळाल्याशिवाय सोयाबीन न विकण्याचा सामूहिक निर्णय घ्यावा असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांंनी केले आहे.

हेही वाचा ! कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, असा करा अर्ज !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय