Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : ओतूर विकास सोसायटीची 72 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

जुन्नर : ओतूर विकास सोसायटीची 72 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

spot_imgspot_imgspot_imgspot_img

ओतूर / प्रमोद पानसरे : ओतूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तुषार शिवाजी थोरात होते. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संचालक मंडळ व सचिव ईश्वर हांडे यांनी समर्पक उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा ! पुणे : आदिवासी भागातील सचिन लांडे याची UPSC परिक्षेत गगनभरारी !

चर्चेमध्ये जेष्ठ सभासद उल्हास तांबे, दशरथ डुंबरे, रामदास ढमाले, निवृत्ती तांबे, डी.एम.मोरे आदी सभासदांनी भाग घेतला. तसेच संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संचालक मंडळाचे कौतुक केले. 

संस्थेचे जेष्ठ संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे यांनी प्रास्ताविक केले. देवीदास तांबे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय भाषणात चेअरमन तुषार थोरात यांनी संस्थेच्या भावी योजनांबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा ! पुणे : गोमांस तस्करी विरोधातील नारायणगाव पोलिसांची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय