Saturday, April 20, 2024
Homeकृषीनांदेड : सोयाबीन दरात मोठी घसरण, छावा संघटनेचे मुखेड तहसीलदारांना निवेदन

नांदेड : सोयाबीन दरात मोठी घसरण, छावा संघटनेचे मुखेड तहसीलदारांना निवेदन

नांदेड : सोयाबीन दरात मोठी घसरण झाल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मुखेड तहसीलदारांना निवेदन आले.

निवेदनात म्हटले आहे की, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा सतत हमी भावाची मागणी करत असतो परंतु शेतकऱ्याला हमी भाव काही मिळत नाही. मात्र कमी भाव न चुकता मिळतो. त्यामध्ये निसर्गाकडून होणारे नुकसान कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आशा सगळ्या संकटाला तोंड देऊन शेतकरी आपले धान्य पिकवत असतो. परंतु मायबाप सरकार या शेतकरी राजाच्या कष्टाची किंमत करत नाही. 

भाग १सोयाबीनचे दर कोसळले याला जबाबदार कोण ? पहा शेतकरी नेते अजित नवले काय म्हणाले !

गेल्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये परदेशातून येणारी सोयाबीन ची आयात बंद झाल्यामुळे देशातील तेलांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला समाधानकारक भाव आला व शेतकऱ्यांना अच्छे दिन आल्यासारखे वाटले. परंतु शेतकऱ्याचे नवीन सोयाबीन बाजारात येताच सोयाबीन दारात निम्म्यावर घसरण झाली आहे. त्यामुळे अच्छे दिन चे रूपांतर बुरे दिन मध्ये झाल्याची चर्चा संबंध राज्यामध्ये होत आहे. 

परंतु महाराष्ट्रालगत असणाऱ्या मध्यप्रदेश राज्यामध्ये 10 ते 11 हजार भाव आहे याचे कारण काय ? या कृषिप्रधान देशामध्ये एक राज्यास जास्त भाव व दुसऱ्या राज्यास कमी भाव हा दुजा भाव कशामुळे याचे उत्तर सरकारने द्यावे. असा सवालही करण्यात आला आहे.

भाग २ सोयाबीनचे दर कोसळले याला जबाबदार कोण ? पहा शेतकरी नेते अजित नवले काय म्हणाले !

केंद्र सरकार शेतकरी, कष्टकरी व कामगार विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या काळात अखिल भारतीय छावा संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन सोयाबीन भाव वाढीसाठी व इतर मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 निवेदन देतेवेळी छाव संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्याजी शिंदे, गिरीधर केरुरकर स्वप्निल पवळे, माधव शिंदे उपस्थित होते.


हेही वाचा ! कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. संदिप ठाकरे यांना इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड पुरस्काराने केलं सन्मानित

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय