Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणजुन्नर : मनरेगाच्या माध्यमातून चावंड येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात, गावातच मिळाला रोजगार...

जुन्नर : मनरेगाच्या माध्यमातून चावंड येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात, गावातच मिळाला रोजगार !

spot_imgspot_imgspot_imgspot_img


जुन्नर / शिवाजी लोखंडे
 : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चावंड ग्रामपंचायत येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेली अनेक वर्ष मेमाणेवस्ती ते वनदेववस्ती येथे दळणवळणाची सुविधा नव्हती. येथील लोकांना येण्या- जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.

रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व्हावी आणि यातून लोकांना गावातच रोजगार निर्माण व्हावा ही मागणी जोर धरू लागल्याने अखेर प्रशासनाने मनरेगातून हा रस्ता मंजूर केला. यासाठी सुमारे 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लोकांना  गावातच रोजगार निर्माण झाला आहे. गुरुवार दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी सुमारे ३७ कामगार या रस्त्याच्या कामावर हजर झाले आहेत. 

ब्रेकींग : सोयाबीन दरात मोठी घसरण, 27 सप्टेंबर रोजी किसान सभेची आंदोलनाची घोषणा 

यावेळी उपसरपंच माधुरीताई सतिश कोरडे, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे, पेसा सदस्य शेवंताबाई बांबळे, कुकडेश्वर वन धन सदस्य एकनाथ मुंढे, लक्ष्मण कोरडे, शंकर उतळे, भीमाबाई बांबळे, किसन शेळकंदे ,तुळसाबाई उतळे, शोभाताई मेमाणे, मीराबाई उतळे, अनंता शेळकंदे, रोहिदास सोनवणे, सदाशिव लांडे, धोंडू बांबळे उपस्थित होते.

ग्रामस्थांनी महाराष्ट्र जनभूमीशी बोलताना सांगितले की, गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर, पेसा कायदा, रोजगार हमी योजना आणि वन धन योजना यांची तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत चावंड येथे रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि प्रयत्नशील आहोत.

हेही वाचा ! जुन्नर : ओतूर विकास सोसायटीची 72 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

यावेळी पुणे जिल्हा किसान सभा उपाध्यक्ष कॉ.विश्वनाथ निगळे, पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी भोर, यशवंत शेळकंदे, ग्रामसेवक विरणक, रोजगार सेवक रोहिदास शेळकंदे, अविनाश शेळकंदे यांनी यावेळी कामाविषयी मार्गदर्शन केले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय