Friday, May 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव उत्साहात साजरा

आळंदीत श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव उत्साहात साजरा

आळंदी / अर्जुन मेदनकर : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत धार्मिक कार्यक्रमांनी प्रथापरंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात साजरा झाला. मोठ्या प्रमाणात भाविकांचे उपस्थितीत धार्मिक सप्ताह सांगता काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीने झाली. जन्मोत्सव दिनी घंटानाद, पुष्पवर्षाव, कीर्तनसेवा, गावकरी भजन सेवा उत्साही हरिनाम गजरात झाली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला. Shrikrishna and Mauli birthdays are celebrated with enthusiasm

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील परंपरेने गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीचे जन्मोत्सव अवतार दिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना पवमान अभिषेक पूजा, दुधारती,११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदमंत्रजयघोषात अभिषेक करण्यात आला. भाविकांचे समाधी दर्शन, दुपारी श्रीचा गाभारा स्वच्छता आणि श्रीना उपवासाचा महानैवेद्य झाल्यानंतर भजन उत्साहात झाले. श्रीचे दर्शनास गाभा-यातून भाविकांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर श्रीना वैभवी पोशाख करण्यात आल्याने श्रींचे श्रीकृष्ण अवतारतील रूप लक्षवेधी दिसत होते. नित्यनैमितिक परंपरेचे कीर्तन, श्रीची दुपारती नंतर हरिपाठ झाला. श्रींचे गाभार्यात पुष्प सजावट करण्यात आल्याने गाभारा लक्षवेधी दिसत होता.

गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव कीर्तन सेवेचे मानकरी संतोष मोझे यांचे वतीने डॉ. नारायण महाराज जाधव यांची सुश्राव्य हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवा आणि विना मंडपात गावकरी भजन एकाच वेळी झाले. आळंदी देवस्थानचे वतीने श्रीची गोकुळ पूजा विश्वस्त विकास ढगे पाटील यांचे हस्ते झाली. 

यावेळी विश्वस्त माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष माऊलींचे मानकरी राहुल चिताळकर पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, श्रीचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, पालखी सोहळ्याचे ऋषिकेश आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, पूरोहित राजाभाऊ चौधरी, नाना चौधरी, अमोल गांधी, पप्पू कुलकर्णी, योगेश चौधरी, सुमित चौधरी, मानकरी योगेश आरू, योगिराज कु-हाडे, स्वप्नील कु-हाडे, अनिल कुऱ्हाडे, साईनाथ ठाकूर, राजाभाऊ रंधवे, नरहरी महाराज चौधरी, निलेश लोंढे महाराज आदि उपस्थित होते.

वंशपरंपरेने मानकरी मोझे संतोष मोझे यांचे वतीने हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात हरिनाम गजरात झाले. श्रीचे जन्मोत्सव प्रसंगी पुष्पवृष्टी, आरती, सुंठवडा प्रसाद, उपवासाची खिरापत, मानकरी, सेवक यांना भाविकांसह देवस्थान तर्फे वाटप करण्यात आली. आळंदी देवस्थानचे वतीने नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेने झाला. गोकुळाष्टमी सप्ताहाची सांगता हरिनाम गजरात झाली.

व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने यांचे सह कर्मचारी, मानकरी यांनी गोकुळाष्टमी सप्ताहासाठी आळंदी देवस्थानने यशस्वीतेस परिश्रम घेतले. सप्ताहात मानकरी, कर्मचारी वृंद , भाविक, नागरिकांनी अन्नदान सेवा रुजू केली.

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत हरिनाम गजरात भाविकांचे उपस्थितीत झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात झाला. यात माऊली मंदिरात यानिमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन-प्रवचन राज्यातील नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांची सुश्राव्य सेवा आळंदीत भाविकांना पर्वणी ठरली. मंदिरातील धार्मिक महत्त्व लक्षात घेत आळंदी देवस्थानने कार्यक्रम आणि माऊली मंदिरात श्रींचे गाभा-यात पुष्प सजावट आकर्षक केल्याने मंदिर परिसर लक्षवेधी दिसत होता.

 सरदार बिडकर वाडा येथे श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव विविध उपक्रमांनी धार्मिक परंपरांचे पालन करीत साजरा करण्यात आला. 

यावेळी आळंदी जनहित फाउंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समिती व श्रीकृष्ण मंदिर यांचे तर्फे माजी मुख्याध्यापक नानासाहेब साठे, राहुल चव्हाण यांचा सत्कार श्रीकृष्ण मंदिर सरदार बिडकर वाडा येथे श्री हरप्रीतसिंग बिडकर महाराज यांचे हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी अर्जुन मेदनकर, राहुल चव्हाण, अविनाश राळे, उमेश बिडकर, सूर्यकांत खुडे आदी उपस्थित होते. यावेळी श्रींची पूजा, भजन, जन्मोत्सव पाळणा, आरती, महाप्रसाद वाटप करण्यात आल्याचे उमेश बिडकर यांनी सांगितले. सिद्धबेट मध्ये देखील धार्मिक परंपरांचे पालन करीत श्रींचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. या निमित्त कीर्तन हृदयस्पर्शी वाणीतून झाले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कारण्यातआले यासाठी अध्यक्ष विकास मुंगसे, बाळासाहेब वहिले, माऊली दास महाराज सिद्धबेट ग्राम विकास प्रतिष्ठान ने जन्मोत्सव सोहळ्याचे यशस्वीतेस परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय