Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाशिवपूत्र संभाजी महाराज महानाट्य पोलिसांकडून बंद पाडण्याची धमकी; खासदार अमोल संतापले !

शिवपूत्र संभाजी महाराज महानाट्य पोलिसांकडून बंद पाडण्याची धमकी; खासदार अमोल संतापले !

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेले शिवपूत्र संभाजी महाराज महानाट्य पोलिसांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. “पास दिला नाही तर कसं नाटक होतं ते बघतो”, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावे अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अना पोलीस कर्मचाऱ्यांना समज द्यावी, असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले आहे. वर्दी ही जबाबदारीची असते याची जाणीव ठेवावी, असेही कोल्हेंनी ठणकावून सांगितले आहे.

यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, यापूर्वी संभाजीनगर कोल्हापूर निपाणी या ठिकाणी जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला.

मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आला आहे. शिवपुत्र संभाजी नाटकाच्या प्रयोगाची फुकट तिकीटे मिळाली नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो हेच पाहतो, अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली. माझा विरोध हा व्यक्तीला नसून अशा प्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

संबंधित लेख

लोकप्रिय