Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाअकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू

अकोला : महाराष्ट्रातील अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली, याबाबत सविस्तर वृत्त ‘एएनआय’ दिले आहे.

एका व्हिडिओमध्ये दोन्ही गटांचे सदस्य एकमेकांवर दगडफेक करताना, वाहनांचे नुकसान करताना आणि रस्त्यावर गोंधळ घालताना दाखवण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे प्रशासनाला CrPC च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यास भाग पाडले.

या हिंसक संघर्षानंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आली आहे, असे अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने काही वाहनांचे नुकसान केले आहे. किरकोळ वादातून हिंसक घटना घडल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यावर मोठ्या जमावाने मोर्चा काढला.

हिंसक जमावाने परिसरातील काही वाहनांना लक्ष्य केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार अकोला शहरात कलम 144 बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

अकोल्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरातील शंकर नगर परिसरात दोन गटात हिंसक हाणामारी झाली होती.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय