दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. आयओएचे सचिव कल्याण चौबे यांनी कुस्ती महासंघासाठी आदेश जारी करत सर्व पदाधिकाऱ्यांना आर्थिक व प्रशासनिक कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून सध्या वादात सापडलेले बृजभूषण सिंह यांचा कार्यकाळ आधीच संपुष्टात आला होता. पण आता त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. क्रीडाधोरणानुसार त्यांना आता पुन्हा निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांवर निर्बंध घातल्यामुळे बृजभूषण यांचे अध्यक्षपदही गेले आहे.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप प्रमुख कुस्तीगीरांनी केले आहेत. सध्या त्यावरून या खेळाडूंचे जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. बृजभूषण यांना तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.
कुस्ती महासंघाच्या निवडणुका येत्या ४५ दिवसांत घेण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. ३ मे रोजी यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून त्यात वुशूचे भूपेंदर सिंह, ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर व निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे.
हे ही वाचा :
कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय
Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन
“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे
जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील