Sunday, April 28, 2024
Homeआंबेगावपश्चिम आदिवासी भागातील एसटी बसच्या वेळात सावळा गोंधळ

पश्चिम आदिवासी भागातील एसटी बसच्या वेळात सावळा गोंधळ

जुन्नर : जुन्नर बसस्थानकातून आंजनावळे, देवळे व आंबोली भागातील आदिवासी भागातील प्रवाशांसाठी एस.टी. बसेस सोडल्या जातात. मात्र, अनेक दिवसांपासून या भागात नादुरुस्त बस पाठविल्या जातात. तर अनेकदा दुपारच्या वेळच्या फेऱ्या रद्द केल्या जाता, असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. Shadow confusion during ST bus timings in western tribal areas

याबाबत विद्यार्थी सौरभ रावते म्हणाले, “जुन्नर बस स्थानकात तक्रार पुस्तक नाही. तसेच प्रवाशांना टोल फ्री तक्रार क्रमांक दिला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना तक्रारही करता येत नाही. आठवड्यातून दोन ते तिन वेळा २:०० दुपारच्या वेळेत सुटणारी जुन्नर- अंजनावळे या बस फेऱ्या अचानकपणे रद्द केल्या जातात” 

दि. १ सप्टेंबर २०२३ दुपारी २ वाजता सुटणारी जुन्नर – अंजनावळे ही बस फेरी अचानकपणे रद्द करण्यात आली. तर त्यानंतर ३:१५ ला जाणारी जुन्नर अंजनावळे बस तब्बल तीन तास उशीर म्हणजे ०४:१५ वाजता सुटल्याने ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी व प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय